चांद्रयान – 3 चंद्रावर पोचले हा क्षण संपूर्ण भारत वर्षासाठी अभिमानाचा, आत्यंतिक आनंदाचा क्षण होता. इस्रोच्या शास्त्रज्ञानी बुद्धीची कमाल दाखवत चांद्रयान – 3 मोहीम यशस्वी केली. या आनंदात सहकार क्षेत्रातही सहभागी व्हावे यासाठी स्वरूपानंद पतसंस्थेने विक्रम ठेव योजना दि.२६ ते ३० ऑगस्ट २०२३ साठी घोषित केली. या योजनेला चांद्रयान – 3 च्या यशाने आनंदीत झालेल्या ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ३ दिवसात ५ कोटी ४० लाखांच्या नव्या ठेवी स्वरूपानंद पतसंस्थेत गुंतवल्या गेल्या. चांद्रयानाचे यश साजरे करण्यासाठी ९% व्याजदर घोषित केला. त्याचा लाभ गुंतवणूकदारांनी घेत मोठी गुंतवणूक केली. अद्यापही दि.३० ऑगस्टचा दिवस बाकी आहे. दि.३० ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत ही योजना सुरू असेल. अखेरच्या दिवशी आयकर मर्यादा पात्र रोख रक्कम अगर बँक RTGS,NEFT अथवा उद्याच क्लियर होऊ शकतील असे चेक द्वारा ठेव स्विकारता येईल. दुपारी २.०० वाजेपर्यंतच्या मुदतीत आलेली ठेव स्विकारली जाईल.
स्वरूपानंदच्या सर्वच शाखांमध्ये ठेवीदारांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. दिनांक २९/०८/२०२३ मंगळवार रोजी एका दिवसात २ कोटी ३० लाखांच्या ठेवी जमा झाल्या पैकी प्रधान कार्यालयात ९५ लाखांच्या ठेवी जमा झाल्या.
ठेवीदारांचा स्वरूपानंद पतसंस्थेवर असलेला विश्वास पूर्ण आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने उत्तम सेवा देत जपत राहू असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.











