मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुका विकास मडळ [ F 1428 ] मुंबई संचलीत लाल बहादुर शास्त्री हायस्कुल दहागाव प्रशाले मध्ये 5 सप्टेबर 2023 हा दिवस शिक्षकदिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला प्रशालेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षिका तसेच शिपाई म्हणून आज रोजी काम पाहिले . या मध्ये इ. 9 वी व 10 वी मधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता मुख्याध्यापक म्हणून कुमार ओम गांधी मराठी विषय शिक्षिका कु. सोनल गमरे, विज्ञान शिक्षिका कुमारी सावरी जाधव , गणित शिक्षक कुमार ओम गाधी , हिंदी शिक्षक कुमार उमेश कांबळे, इ. भू . शिक्षक कुमार भोसले अदित्य घाणेकर तसेच शा.शि. शिक्षिका कु. होडबे तसेच इयत्ता 9वी मधील कुमारी गायत्री महाडिक , रिया जाधव , श्रावणी दळवी , देवूरकर, चव्हान सानिया , चव्हान सलोनी . वंशिका कांबळे, या सर्वांनी वेग वेगळ्या विषयांचे अध्यापन केले . शिपाई म्हणून कुमार आजर्लेकर व मित होडबे यांनी कामगिरी पार पाडली . दुपार सत्रात सर्व विध्यार्थ्यांनी अध्यापनाचे आपले अनुभव कार्यक्रमात सांगितले . आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हुलगे सर यांची इ. 6 वीतील चिमुकल्यांनी सरांची मुलाखात दमदारपणे घेतली. त्या मुलाखतीत सरांनी आपले बरेचसे अनुभव कथन केले. हा एक खुप अवर्णनीय प्रसंग होता. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थी वर्गांचे होते. तदनंतर शिक्षक प्रतिनिधी सौ नाटेकर मॅडम , श्री शेलेसर , यानी सर्वांचे कौतुक केले . अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम. पवार मॅडम, शिक्षिका सौ पालांडे मॅडम , कला शिक्षक कलमकर सर , श्री जाधव सर , क्रिडा शिक्षक श्री माने सर ‘ लिपिक भाऊसाहेब दळवी शिपाई श्री गौडभाऊ, श्री गुडेकर भाई उपस्थित होते .












