माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.व सगळ्या विद्यार्थ्यांकडून स्व हस्ते बनवून घेण्यात आले. प्रशालेतील शिक्षक अमोल पाटील यांनी विद्यार्थ्याना आकाश कंदील बनवण्याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी पर्यवेक्षक अंबादास घाडगे,नानासाहेब ठोंबरे,सचिन कदम,हरिश्चंद्र पागडे,महादेव परब,आदी उपस्थित होते.











