मंडणगड l प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाली मंडणगडचे दिनेश शिगवण यांची संस्थेच्या चेअरमन पदी तसेच चिपळूणचे प्रतापसिंह नाईक यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.पतसंस्थेची सन 2023 ची निवडणूक प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2023 ते 8 नोव्हेंबर 2023 पर्यंत राबवण्यात आली होती यावेळी पतसंस्थेत सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
नवनिर्वाचित संचालक पुढील प्रमाणे- खेड -सुहास कासार, सौ वर्षा जगताप, दापोली- रुपेश शिंदे, उदय शिगवण, चिपळूण-सौ अर्चना कहाने, गुहागर- अनंत गावणंग, रत्नागिरी- संजय लोखंडे, संगमेश्वर- सुहास शिंदे, अनिल गोपाळ, लांजा-प्रवीण ठाकुर देसाई, राजापूर -सचिन हातणकर, सतीश आराख त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सदर निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी अध्याशी अधिकारी म्हणून कुमार देवरुखकर यांनी निवडणुक प्रक्रिया राबविली यावेळी रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष ए.के.शिंदे व जिल्हा सेक्रेटरी संजय दळवी जिल्हा संघटक एम.टी सुर्वे, संतोष हुमणे,माजी चेअरमन के. डी. पवार, मंगेश पिंगळे मंडणगड तालुका अध्यक्ष दिनेश जाधव,सचिव पालवे ,चिपळूण तालुका सचिव हांगे, संगमेश्वर तालुका अध्यक्ष लोटणकर, सचिव राजेंद्र पाटील व्यवस्थापक रोशन खेतले कर्मचारी दीपक नवेले इतर संघटना पदाधिकारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












