रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाटय स्पर्धा सन २०२३-२४ चा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच वेंगुर्ले, (जि. सिंधुदुर्ग) केंद्रावर झाला.
रा. प. रत्नागिरी विभागाचे “किनारा” हे नाटक आंतरविभागीय नाटयस्पर्धा सन २०२३-२४ वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) केंद्रावर प्राथमिक फेरित प्रथम आले. त्यानंतरच्या नांदेड येथिल अंतिम फेरीत सुद्धा प्रथम विजेते ठरले. मोहनदास भरसट, महाव्यवस्थापक (क.व. औ.सं), श्रीनिवास जोशी, उपमहाव्यवस्थापक (नियंत्रण समिती क्र.०१) आणि राजेश कोनवडेकर, मुख्य कामगार अधिकारी, रा.प.मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचे प्रमुख उपस्थितीत नंदकुमार पाटील, मराठी नाटक, चित्रपट, मालिका अभिनेता यांच्या शुभहस्ते प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, विलास चौगुले, कामगार अधिकारी, राजेश मयेकर, नाटय दिग्दर्शक आणि सर्व नाटय संघ कलाकार कर्मचारी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.
रा. प. रत्नागिरीच्या किनारा नाटकासाठी प्रथम दिग्दर्शकाचे पारितोषिक राजेश मयेकर, प्रमुख कारागीर यांना मिळाले. प्रथम नेपथ्याचे पारितोषिक कार्यशाळा कर्मचारी प्रविण बापर्डेकर, विजय मेस्त्री व रविंद तेरवणकर यांना मिळाले. प्रमुख स्त्री कलाकाराचे पारितोषिक सहा. वाहतूक निरिक्षक श्रीमती श्रध्दा मयेकर यांना मिळाले आणि उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक कार्यशाळा कर्मचारी प्रशांत आडीवरेकर यांना मिळाले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाटयस्पर्धा सन २०२३-२४ च्या वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) केंद्रावर प्राथमिक फेरित रा.प.रत्नागिरी विभागाचे नाटक किनारा दि.२३.१२.२०२३ रोजी सादरीकरण करण्यात आले होते. तसेच नांदेड केंद्रावर संपन्न झालेल्या अंतिम नाटय फेरित रा.प.रत्नागिरी विभागाचे नाटक किनारा हे दि.०३.०१.२०२४ रोजी सादरीकरण करण्यात आले होते. रा.प.रत्नागिरी नाटय संघाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून कौतुक करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











