चिपळुणातील जि. प. शाळांमध्ये यावर्षी १ हजार २५७ मुले करणार शैक्षणिक आयुष्याचा श्री गणेशा

 

चिपळूण  : यावर्षी शैक्षणिक २०२४ – २५ हे वर्ष 15 जून रोजी सुरू होत आहे. यावेळी नवीन विद्यार्थी पहीलिमध्ये प्रवेश घेतात. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित शाळा असा एकूण 397 मध्ये शाळांमध्ये यावर्षी 1 हजार 257 मुले आपल्या शैक्षणिक आयुष्याचा श्री गणेशा गिरवणार आहेत .

 

दरवर्षी इयत्ता पहिली मध्ये मुले प्रवेश घेत असतात. यामध्ये मराठी माध्यम, सेमी, उर्दु माध्यम आणि सेमी यांचा समावेश असतो. शाळेच्या पहिल्याच दिवशी या मुलांचं सर्वच शाळांमध्ये स्वागत ढोल ताशा वाजवून आणि गुलाब पुष्प देऊन केले जाते. जेणेकरून नवीन येणाऱ्या मुलांना उत्साह आणि आनंद वाटला पाहिजे. मात्र काही मुलेही या दिवशी शाळेत जाताना थोडीशी भांबावलेली असतात. काही रडत असतात. कारण प्रथमच ते जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करत असतात. तेथील वातावरण त्यांच्यासाठी नवे असते. त्यामुळे नक्कीच अशी लहान मुले भांबावून जातात.
चिपळूण तालुक्यातील 397 शाळांमध्ये या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिली मध्ये 1 हजार 257 मुले आपल्या आयुष्याचे धडे गिरवण्यासाठी सज्ज झाली आहेत . ही सर्व मुले 15 जून रोजी शाळेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सज्ज आहेत.