मंडणगड | प्रतिनिधी : योगा म्हणजे शरीराचा आणि मनाचा व्यायाम. मानवाला मनःशांती व स्वतःचा बौद्धिक विकास करायचा असेल तर नियमित योगासने करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दहागाव येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री हायस्कूलचे मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे यांनी केले.
जागतिक योगदिना निमित्त प्रशालेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, आजच्या धकाधकीच्या जीवनात, मनावर ताण वाढत आहे, त्यामुळे मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते, धावपळीच्या युगात माणसाला मनःशांती भेटत नाही, मनाला शांती व शरीर सदृढ बनवण्यासाठी योगासनांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे नियमित योगासने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात यावेळी प्रशालेचे शिक्षक विक्रम शेले यांनी योगासने याविषयी विस्तुर्तपणे उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शिक्षक पी. बी.जाधव, सौ. नाटेकर मॅडम यांची मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास प्रशालेचे शिक्षक श्री.कलमकर, शिक्षिका सौ.नाटेकर, श्रीम.पवार, प्रशालेचे लिपिक श्री. दळवी, शिपाई श्री गौड, श्री गुडेकर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.माने यांनी मानले.











