असगणी मधील प्रौढा चे निधन

 

खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील असगणी येथील एस आर फाटा नजिक क्रेन ने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी वरील ६७ वर्षीय दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला होता त्याचे २४ रोजी सकाळी ६ वा च्या सुमारास उपचार सुरू असताना निधन झाले

रामचंद्र विठ्ठल जाधव वय ६७ रा. असगणी समर्थनगर ता. खेड असे त्या निधन झालेल्या प्रौढाचे नाव आहे

यातील मयत हे सायकलने किराणा मालाचे सामान आणण्यासाठी लोटे खेड येथील खेडेकर किरणा मालाचे दुकानात गेले होते तेथुन सायकलने एम.आय.डी.सी लोटे येथे त्यांच वडापाव टपरी असल्याने त्या ठिकाणी आले असता ति टपरी बंद असल्याने ते परत असगणी घरी जात असताना एस.आर.फाटा या ठिकाणी क्रेन हायड्रा जोराने येवुन ठोकर दिल्याने त्यांना दुखापत झाल्याने त्यांना अपरांत हॉस्पीटल चिपळुण येथे उपचाराकरीता दाखल केले असता उपचार चालु असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन मयत घोषीत केले