थंड हवेचे ठिकाण माचाळ येथे शुक्रवारी वृक्ष लावगड कार्यक्रम

 

लांजा (प्रतिनिधी) तालुका ग्रामसेवक युनियन आणि लांजा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवारी १२ जुलै रोजी माचाळ येथे उंब्रवणे ते माचाळ रस्ता दुतर्फा वृक्ष लावगड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार हे उपस्थित राहणार आहेत. माचाळ हे थंड हवेचे ठिकाण व क वर्ग पर्यटन केंद्र असून याठिकाणी जाण्यासाठी थेट रस्ता झाल्याने दिवसेंदिवस या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

 

तालुका ग्रामसेवक युनियन आणि लांजा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवारी माचाळकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा
औषधी वनस्पती आणि उपयोगी झाडे यांचे लागवड करण्यात येणार आहे. लांजा तालुका ग्रामसेवक युनियनने यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रभारी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.