जिल्हा नियोजन समिती बैठक
संतोष राऊळ (ओरोस) तुम्हाला बंद खोलीत ठेवले पाहिजे. परिपत्रक प्रमाणे काम करत नाही. तुमच्या कामाची पद्धत काय तर कोण भेटायला येतो काय याची वाट पाहत आहे.अशा शब्दात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुनावले.दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३१ जुलै पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आदेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
९०२ शिक्षक भरती मध्ये येवून सुद्धा देवगड मधील १२ शाळा शून्य शिक्षकी शाळा आहेत. मग भरती करून उपयोग काय ? शिक्षणाधिकारी यांचे काम फारच ढिसाळ आहे. असा सवाल संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केला. दरम्यान डीएड बेरोजगार युवकांना सेवेत घेतले जाण्यावर चर्चा केली मात्र नव्याने आलेले शिक्षक भरती प्रक्रिया झाली आहे आणि शिल्लक जागा आहेत काय त्या जागा असतील तर या डीएड बेरोजगार ना संधी देवू शकता अशी चर्चा झाली. मागणी प्रमाणे नियुक्ती देवू असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.मात्र प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कामाबद्दल सभागुहत नाराजी पाहून आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांच्या बदलीची मागणी केली.











