
राजापूर (वार्ताहर): विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संत निरंकारी चैरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने संत निरंकारी मंडळ कोदवली राजापूर युनिटच्या वतीने शहरानजीकच्या शीळ येथे वृक्षरोपण कार्यक्रम व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी कोदवली राजापूर युनिटचे मुखी सिध्देश शिंदे, सेवादल संचालक दत्तराज सुवार, शीळ सत्संग आयोजक पर्शुराम नागरेकर, बलसत्संग इन्चार्ज सारीका कोतरे, प्रेस व पब्लिसिटी विभागाचे सुभाष नवाळे, जनार्दन मांडवकर, विष्णू घाणेकर, दशरथ लिगम, विजय बंडवे, रामचंद्र मांडवकर, प्रकाश हातणकर यांच्यासह सुमारे ७० भक्तगण यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी वृक्षरोपण कार्यक्रमांतर्गत वड, जांभूळ, चिंच इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली.











