दोडामार्ग : प्रतिनिधी : झोळंबे – दापटेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या अमृतमहोत्सवी समाधी वर्षानिमित्त रविवार २५ ऑगस्ट रोजी संत वाडमय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील संतांची महती आणि संतांचे सामाजिक कार्य असे दोन विषय देण्यात आले आहेत.
सदर स्पर्धा ७ ते ११ वर्षे (लहान गट) आणि १२ ते १६ (मोठा गट) अशा दोन गटात होईल. लहान गटासाठी ४ मिनीटे व मोठ्या गटासाठी ७ मिनिटांचा वेळ राहील. श्री विठ्ठल मंदिरात सकाळी ९.३० वाजता बांदा खेमराज हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एस. व्ही. नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी श्री पांडुरंग मंदिर उत्सव कमिटी अध्यक्ष प्रवीण गवस, झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, आयोजक रामचंद्र सावंत उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय झोळंबे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४०५२२८३६०, ९४२२९८१५२७ किंवा ९८८१८६०६६० यांच्याशी संपर्क साधावा.











