श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक सुयोग पंडित यांचा सत्कार!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील पळसंब गावच्या श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने लेखक श्री. सुयोग पंडित व सौ फिलोमीना पंडित यांचा श्री जयंती देवी मंदिरात सत्कार संपन्न झाला.यावेळी पळसंब गावच्या वतीने देखिल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
लेखक म्हणून श्री सुयोग पंडित यांची पहिलीच कादंबरी तसेच पहिलीच संपूर्ण मालवणी बोलीभाषेतील कादंबरी “सुक्या सुंगटाची कढई” ही नुकतीच प्रकाशित झाली आहे. पंडित दांपत्याने त्या कादंबरीची एक प्रत श्री जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंबच्या वाचनालयाला भेट म्हणून दिली.

मंडळाच्या वतीने आजीव सभासद श्री. परशुराम जाधव व श्री पद्माकर परब यांनी श्री व सौ .पंडित यांचा सत्कार केला तर गांवच्या वतीनेश्री देऊ सावंत व देवस्थान मानकरी श्री बबन पुजारे यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी ज्येष्ठ कलाकर्मी व श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आजीव सभासद व सल्लागार श्री गिरिधर पुजारे, मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत; उपाध्यक्ष अमरेश पुजारे, माजी सरपंच व मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत गोलतकर, अमित पुजारे, शेखर पुजारे, बबन पुजारे, प्रमोद सावंत, आजीव सभासद श्री परशुराम जाधव, पद्माकर परब, अनिकेत परब, मोहन पुजारे, दाजी पुजारे, देऊ सावंत, दत्ताराम सावंत, अर्णव गोलतकर, अनुज गोलतकर, आकाश सावंत, सानिका सावंत, किशोर सावंत, स्वरा सावंत, तुषार सावंत व पळसंब ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित पळसंब वासिय उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी लेखक सुयोग पंडित यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. श्री सुयोग पंडित यांनी त्यांच्या मनोगता मध्ये पळसंब गांवाचे व श्री जयंती दैवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांचे आभार मानले.
स्वागत व सुत्र संचालन श्री गिरीधर पुजारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद सावंत यांनी केले.