खेड(प्रतिनिधी) ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समिती व ओबीसी व्हीजेएनटी कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भरणे येथील गणेश मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पार पडला
इंजिनियर, डॉक्टर, डी-फार्मसी / बी-फार्मसी, १० १२ वी पदवीधर डिप्लोमाधारक, इयत्ता ५वी, ८वी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, राज्य व देश पातळीवर विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू आदी ५०० विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सावर्डे येथील सम्राट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रोहित, मते यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ओबीसी नेते संतोष जैतापकर, राजेश बेंडल, जि.प. सदस्य प्रकाश शिगवण, उद्योजक मिलिंद इवलेकर, संघटनेचे अध्यक्ष दीपक शिगवण, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन गोवळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू सनगरे, राजेंद्र चांदीवडे यांनी केले, तर प्रशांत दळवी यांनी आभार मानले.











