विरण पंचक्रोशीत दत्तजयंती उत्सव!

 

विरण येथे दत्त जयंती उत्सव

मसूरे | झुंजार पेडणेकर : विरण येथील दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त १४ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. श्रींची पूजा दुपारी १२ वा. श्रींची आरती दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद सायंकाळी ५:३० वा. श्री स्वामी समर्थ मृदुंगनाद मृदंगवादन रात्रौ ९ वा. श्री देव रवळनाथ दिंडी भजन मंडळ आडवली (भटवाडी) बुवा- मयूर लाड, तालमणी- रवि लाड. इत्यादी कार्यक्रम होणार आहेत भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विरण येथील ग्रामस्थांनी केले आहे.

श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे

मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे येथे शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ६ वाजता श्रींचे स्नान ,सकाळी ८ वाजता श्रींचा चरण पादुका अभिषेक, सकाळी १० वाजता श्री सत्यदत्त पूजा, सकाळी ११ वाजता श्रीदत्त होमहवन ,दुपारी १२ वाजता ब्रह्मांडनायक दिनदर्शिका २०२५ से प्रकाशन , दुपारी १२:३० आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, दुपारी ४ ते ६:३० स्थानिकांचे सुस्वर भजने , सायंकाळी ७ वाजता सामूहिक नामस्मरण ,राञौ ७:३० वाजता पालखी प्रदक्षिणा ,राञौ ८:३० वाजता आरती ,राञौ ९ वाजता महाप्रसाद ,राञौ १० वाजता बुवा श्री सचिन मेस्त्री माऊली प्रासादिक भजन मंडळ बीडवाडी कणकवली यांचे भजन असे कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भक्त मंडळींनी उपस्थित राहून स्वामी समर्थ दर्शनाचा व पालखी पादुका दर्शनाचा व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पोईप खालची माधववाडी येथे दत्त जयंती उत्सव.
मालवण तालुक्यातील पोईप खालची माधववाडी येथे सालाबाद प्रमाणे कै. धोंडी बाबाजी माधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री दत्त मंदिरात खालची माधववाडी समस्त माधव, राणे, शिरोडकर यांच्या आयोजनाखाली १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे.
यानिमित्त दत्त मंदिरात सकाळी ११ वा. श्रींची पूजा, दुपारी १२ वा. आरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ८ वा. दत्तजन्म सोहळा व आरती, रात्री ९ ते ११ पालखी सोहळा, रात्री १२ वा. गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळ, हळवल यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन खालची माधववाडी पोईप यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

चुनवरे खांबडवाडी दत्त जयंती उत्सव
विश्राम प्रेरणा मंडळ व ग्रामस्थ चुनवरे यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त जयंती निमित्त १४ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता श्रींची पूजा दुपारी १२ वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद दुपारी १ ते ३ महाप्रसाद सायंकाळी सात वाजता श्री देव जैन रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ चुनवरे बुवा- महेश परब.
श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप बुवा-ओंकार येरम. श्री देव जैन रामेश्वर वारकरी दिंडी भजन मंडळ चुनवरे बुवा- महादेव बागवे. यांची भजने होणार आहेत भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्राम प्रेरणा मंडळ चुनवरे खांबडवाडी व ग्रामस्थांनी केले आहे.

गोळवण दत्त जयंती उत्सव
गोळवण येथील दत्त मंदिरात १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता अभिषेक, सकाळी १० वाजता श्री दत्त पूजा, दुपारी १ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी सात वाजता परिसरातील ग्रामस्थांची सुस्वर भजने इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन घाडीगावकर कुटुंबीय व गोळवण ग्रामस्थांनी केले आहे.