विद्यार्थ्यांकडून प्रशालेला विज्ञान विभागासाठी कपाट भेट
वैभववाडी | प्रतिनिधी : माध्यमिक विद्यालय उंबर्डे प्रशालेतील सन 2002-03 मधील बॅच दहावीचा माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व मेळावा विद्यालयात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असताना शिक्षकांसमोर घडलेले प्रसंग विद्यार्थ्यांनी आठवण करून दिले. यावेळी उपस्थित गुरुजनांचे विद्यार्थ्यांनी आशीर्वाद घेतले. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची विचारपूस केली. जसे आज एकत्र आलो, तसेच यापुढे देखील प्रत्येक वर्ग मित्राच्या सुखदुःखात आम्ही अशीच एकजूट दाखवू असे याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्व माजी विद्यार्थ्यांनकडून शाळेला विज्ञान विभागासाठी कपाट भेटवस्तू म्हणून देण्यांत आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डी. एस. ढगे उपस्थित होते. तसेच माजी मुख्याध्यापक एम. एन. पाटील सर, माजी मुख्यद्यापक एस. एम. बोबडे, विद्यमान मुख्यद्यापक श्री. राठोड सर
संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी आणि माजी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











