मुस्लिम वेल्फेअर सोसायटी च्या रत्नागिरी शाखेची नुतन कार्यकारिणी जाहीर 

लांजा (प्रतिनिधी) मुस्लिम वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या रत्नागिरी शाखेची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी समद सोलकर तर महिला अध्यक्षपदी निक्कत डिंगणकर यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेची सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली. ही सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत रत्नागिरी तालुका अध्यक्ष म्हणून समद सोलकर यांची निवड करण्यात आली. तसेच निक्कत डिंगणकर यांची महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. तसेच शहर अध्यक्षपदी सलमान हाजु आणि कोअर कमेटी सचिवपदी सौ.वृंदा बोरकर यांची निवड करण्यात आली. रत्नागिरी तालुका सचिव म्हणून फरिन खान तसेच युसूफ शिरगांवकर, शहर सचिव हजिरा झारी,यांची उप सचिव शहर अशी निवड करण्यात आली.

सर्वानुमते ही निवड करण्यात आली.या प्रसंगी मुस्लिम वेलफेयर सोसायटीचे संस्थापक अकील नाईक, सल्लागार राज चव्हाण, जया डावर आणि निवडून आलेले सदस्य उस्थित होते.