अर्जुना व कोदवली नदीपात्रातील उपसा केलेला गाळ वाहून नेण्याचे राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांचे आवाहन

राजापूर | प्रतिनिधी : पावसाळ्यामध्ये सातत्याने उदभवणाऱ्या शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अजुर्ना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा जलसंपदा विभागाच्या वतीने यावर्षीही फेर उपसा केला जात आहे. उपसा केलेला गाळ नदीपात्रातून बाहेर वाहून नेणे अपेक्षित असताना मात्र, तो तसाच नदीच्या काठावर पिचींग करून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पिचींग केलेला गाळ पावसाळ्यामध्ये प्राराच्या पाण्यासोबत पुन्हा एकदा नदीपत्रामध्ये वाहून येत साचण्याचा धोका वतर्विण्यात येत आहे. तरी नदीपात्रातील उपसा केलेला गाळ कुणाला न्यावयाचा असेल तर तो स्वखचार्ने वाहून नेण्याचे आवाहन तहसिलदार विकास गंबरे यांनी तालुक्यातील शेतकऱयांना केले आहे. त्यासाठी शेतऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही श्री. गंबरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

राजापूर शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अजुर्ना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करून राजापूरवासियांना दरवर्षी भेडसावणारी पूरस्थितीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. या गाळ उपशाच्या या कामासाठी आमदार श्री, सामंत यांनी शासनाच्या सवर्साधारण जिल्हा वार्षि योजनेतून सुमारे ६४ लाख रूपयांचा निधी मंजूरही केला आहे. या निधीतून जलसंपदा विभागाच्या वतीने यावर्षीही गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून हे काम वेगाने सुरू आहे.
गाळ उपसा झाल्यानंतर त्याची नदीपात्रातून अन्यत्र वाहतूक होणे अपेक्षित आहे. जेणेकरून गाळ उपशानंतर नदीपात्र मोकळे होईल. असे असताना मात्र, उपसा केलेला गाळ तसाच नद्यांच्या काठावर पिचींग करून ठेवण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये नद्यांच्या पाण्याची पातळी वाढताच पिचींग केलेला गाळ पुन्हा एकदा नदीपात्रामध्ये वाहून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपसा केलेला गाळ नद्यांच्या काठावर पिचींग न करता त्याचा अन्यत्र, उपसा होणे गरजेचे आहे. दरम्यान, नदीपात्रातील उपसा केलेला गाळ स्वखचार्ने वाहून नेण्याचे आवाहन तहसिलदार विकास गंबरे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांन केले आहे. शेतीच्या कामासह फळबागायती, जमीन सपाटीकरण वा भरावासाठी ज्या शेतकऱयांना गाळाची आवश्यकता आहे त्यांनी ७ माचर्पयर्ंत तहसिलदार कायार्लयामध्ये रितसर लेखी अजर् करून स्वखचार्ने गाळ घेवून जावा, त्यासाठी महसूल प्रशासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती तहसिलदार श्री. गंबरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.