मसुरे | झुंजार पेडणेकर : “शिका कोकणात, कमवा मुंबईत” हे प्रेरणादायी ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेली ज्ञान जिज्ञासा फाउंडेशन व फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझाईनिंग, कणकवली ही शैक्षणिक संस्था नेहमीच नव्या वाटा शोधत, विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहे. या संस्थेच्या वतीने यंदाचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, समाजप्रबोधन व शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवर शिक्षकांचा या पुरस्कारांतर्गत सन्मान होणार आहे. या पुरस्कारासाठी
मंदार यशवंत सुतार (कॉर्पोरेट ट्रेनर व शैक्षणिक नवोन्मेषक, मुंबई), सुमंत दत्ताराम दळवी( प्राचार्य, माध्यमिक विद्यामंदिर कणेडी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स), वामन रामचंद्र तर्फे (मुख्याध्यापक, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे ),
कांबळे पी. जे.( मुख्याध्यापक, विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली), राखी देवदत्त अरदकर (कला शिक्षिका, अ.शी. दे टोपीवाला हायस्कूल, मालवण),दत्तात्रय मारुती केसरकर (गुरुकुल अकॅडमी, कणकवली) यांची निवड जाहीर झाली आहे.
ज्ञान जिज्ञासा फाउंडेशनचे संस्थापक सचिन बोराटे व फ्लोरेट कॉलेजच्या संचालिका श्रीम.सार्था कदम यांनी या निवडीची घोषणा केली. या पुरस्काराद्वारे शिक्षकांनी केलेल्या परिश्रमांना व सर्जनशील कार्याला योग्य सन्मान मिळणार असून, विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. कोकणातूनच ज्ञानाची नवी ज्योत प्रज्वलित करून, उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या संस्थेचा ध्यास आहे अशी माहिती ज्ञान जिज्ञासा फाउंडेशन व फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझाईनिंग यांच्या वतीने देण्यात आली आहे.












