आमदार निलेश राणे यांनी घेतले राजापूरच्या आडिवरेतील श्री महाकाली देवीचे दर्शन

राजापूर प्रतिनिधी
कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी गुरूवारी राजापूरातील आडिवरेतील श्री महाकाली देवीचे दर्शन घेतले़ याप्रसंगी मंदिर विश्वस्तांच्या वतीने आमदार राणे यांचा सन्मान करण्यात आला़
आमदार निलेश राणे गुरूवारी सायंकाळी राजापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी आडिवरेतील श्री महाकाली मंिदरात भेट दिली व महाकालीचे दर्शन घेतले याप्रसंगी मंदिर देवस्थानचे विश्वस्त प्रसाद शेट्ये यांच्याहस्ते आमदार राणे यांचा सन्मान करण्यात आला़

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, दिपक बेद्रे, शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रकांत पड्यार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, बाळ दाते, अरविंद्र लांजेकर, वसंत पाटील, आशिष मालवणकर, अजित दावडे, परशुराम फणसे, आण्णा तळ्ये, सचिन आडिवरेकर, भूषण सकपाळ, अॅड. समी कुंट्टे, अमोल सकपाळ, जयदीप परांजपे, संजय दाते, पंढरीनाथ जळवी, दिपक हळदणकर, संजय काळे, नागेश सकपाळ, स्मिता नार्वेकर, लिना पुजारे आदी उपस्थित होते़
या दौऱ्यात निलेश राणे यांनी राजापूरातील एसटी डेपाे समोरील जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या नवरात्रौत्सवाला भेट देऊन दुर्गामाताचे दर्शन घेतले़ याप्रसंगी मंडळाच्यावतीने मंडळाचे पदाधिकारी विनय गुरव, विजय गुरव यांनी अामदार राणे यांचा सन्मान केला यावेळी आमदार राणे यांनी जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या नवरात्रौत्सवाला शुभेच्छा दिल्या़
फोटो २ आहेत़
१ राजापूर तालुक्यातील आडिवरेतील प्रसिद्ध श्री महाकाली देवीचे दर्शन घेताना आ़ निलेश राणे याप्रसंगी अन्य मान्यवर
२़ श्री महाकाली देवी मंदिर विश्वस्तांच्यावतीने आमदार निलेश राणे यांचा सत्कार करताना विश्वस्त प्रसाद शेट्ये, याप्रसंगी रवींद्र नागरेकर, बाळ दाते, दिपक बेंद्रे, दिपक नागले, अरविंद्र लांजेकर हे उपस्थित हाेते़