आ. निलेश राणे यांनी राजापूरच्या नवरात्रोत्सवाला भेट दिली

जय महाराष्ट्र मित्रमंडळातर्फे सत्कार

राजापूर:प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी राजापूर येथील जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाला भेट दिली. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

एसटी डेपो येथील जय महाराष्ट्र मित्रमंडळाने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आमदार निलेश राणे यांनी मंडळाला भेट दिली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते विनय गुरव, विजय गुरव आणि रवींद्र नागरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी आमदार राणे यांनी नवरात्रौत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.