चिपळूण (प्रतिनिधी) : विद्या प्रसारक मंडळाचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे २५ व २६ सप्टेंबर रोजी नवोदय टेक फेस्ट २०२५ मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या तांत्रिक महोत्सवात हॅकथॉन, पीसी असेंब्ली, क्यूब टेस्टिंग, ब्रिज मेकिंग, पेपर प्रेझेंटेशन, मोबाईल फोटोग्राफी, ट्रेझर हंट तसेच ट्रिगर रश (बीजीएमआय व फ्री फायर) अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
हॅकथॉन स्पर्धेत घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथील सौरभ सावंत, यश शिंदे, हर्षदीप उमरकर, रुतुजा उमरकर व श्रुती कोलमद्रेकर तर सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे येथील अमेया सुर्यकांत पाटील, सोहम खैर, रुद्र शिंदे व आदित्य कदम यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पीसी असेंब्लीमध्ये आदित्य कानडे (राजेंद्र माने पॉलिटेक्निक), अथर्व राजपूत (सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे) व शिरीष कदम (व्ही.पी.एम. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर) विजयी ठरले. क्यूब टेस्टिंगमध्ये व्ही. पी. एम. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवेदिता जावळे, यश पेडणेकर व वेदिका सकपाळ यांनी चमक दाखवली. ब्रिज मेकिंगमध्ये घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथील जय परब, सानिका ठसाळे, जान्हवी ठसाळे, शिवराज पवार व तसेच बाटु लोणेरे येथील अमेय गैसुंदरे यांनी उत्तम कामगिरी केली. पेपर/पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे येथील अमेया पाटील व आदित्य कदम, व्ही.पी.एम. पॉलिटेक्निक, ठाणे येथील भावेश अडेपवार व ऋषभ दुबळे यांनी विजेतेपद पटकावले. ट्रिगर रश (बीजीएमआय) मध्ये डी.बी.जे. कॉलेज, चिपळूण येथील रुशान कळशेकर, आर्या आंबवकर, मोहम्मद थरानी, कैफ घारे, आर्य अंबुर्ले, वेदांत रहाटे, स्वरग शिंदे व रोहित धवल तसेच आय.सी.एस.आय.टी. सावर्डे येथील यश घोनसे-पाटील, पार्थ चव्हाण, ओम घाग व कार्तिक मुंधेकर विजयी ठरले. तर ट्रिगर रश (फ्री फायर) मध्ये राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील हर्ष तांडले, शिवम शिंदे, अथर्व फाटकुरे व सोहम करंदुळे, आयटीआय गुहागर येथील प्रसाद रहाटे, रेहान महिमकर, फर्मान घाटवाल व फजल सय्यद तर तिसऱ्या क्रमांकावर राज राजेशिर्के, पुष्कर सिंकर, अथर्व घाग व तनय कुडे यांनी आपली छाप उमटवली. या स्पर्धेत सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे, राजेंद्र माने पॉलिटेक्निक आंबव, डी.बी.जे. कॉलेज चिपळूण, व्ही.पी.एम. पॉलिटेक्निक ठाणे, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लवेल, डॉ. तात्यासाहेब नातू कॉलेज मार्गताम्हाणे, एस.व्ही.जे.सी.टी. ज्युनिअर कॉलेज डेरवण आणि बाटु पॉलिटेक्निक कॉलेज लोणेरे आदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या फेस्टमध्ये एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम संगणक विभाग प्रमुख प्रा. केतन कुंडिया, स्थापत्य विभाग प्रमुख प्रा. नंदकिशोर चौगुले व प्राचार्य प्रा. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. संयोजक म्हणून प्रा. कृष्णा मालठणकर व प्रा. अनिकेत जाधव यांनी काम पाहिले तर विद्यार्थी प्रमुख म्हणून कु. शांतनू गुरव व कु. अभिषेक पवार यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाला वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, के. व्ही. पवार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सह्याद्री एज्युकेशन सोसायटी, एस. के. केटरर्स, सचिन सकपाळ कबड्डी असोसिएशन, मिलन ठाकूर (सिव्हिल विभागाचे माजी विद्यार्थी). नातू हॉस्पिटल आणि मालाणी एम्पोरियम, श्रृंगारतळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. “नवोदय २०२५” मुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता, संघभावना व नाविन्यपूर्ण विचार अधिकाधिक बळकट झाले असून या फेस्टने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवे पंख दिले.










