नामजोशी कॉलेज च्या मुलांचा घरडा कॉलेज ला अभ्यास दौरा

संगमेश्वर : तालुक्यातल माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यायल्यातील इयत्ता १२ वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल घरडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी दाभिळ येथे गेली होती.
विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेज कळावे,तेथील अद्ययावत प्रयोगशाळांची ओळख व्हावी या उद्देशाने हो सहल आयोजित करण्यात आली होती.
या ठिकाणी विद्यार्थ्यांना सिव्हिल,मेकॅनिकल,व रसायंनशास्त्र प्रयोगशाळेविषयी माहिती देण्यात आली.या अभ्यास दौऱ्यासाठी घरडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या व्यवस्थापनाचे व स्टाफ चे विशेष सहकार्य लाभले.या अभ्यास दौऱ्यात गौरव पोंक्षे,ओंकार नामजोशी,सचिन साठे,सौ मालती गुरव,ओंकार मूळये आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.