राजापूर । प्रतिनिधी :
आडिवरे गावचे सुपुत्र श्री उमाशंकर दाते यांच्या कामाची दखल आज महाराष्ट्र शासनाने घेतली असून ,सांस्कृतिक विभागाकडून उमाशंकर उर्फ बाळ दाते यांना युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
आजपर्यंत अनेक संस्थाकडून बाळ दाते यांना सन्मानित करण्यात आले आहे,बाळ दाते यांच्या कामाची दखल अमेरिकेत ही घेतली गेली आहे,
गावात राहून संगीत क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे ,या साठी अपार कष्ट ,जिज्ञासू वृत्ती आणि सातत्य या गुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे,आज बाळ दाते यांनी तयार केलेले ऑर्गन भारतात तसेच परदेशात सुध्दा गेले आहेत,पंडित शंकरजी महादेवन, हिंदी चित्रपट निर्माते श्री विशाल भारद्वाज, पंडित श्री उल्हास कशाळकर ,पंडित श्री आनंद भाटे अशा संगीतातील अनेक दिग्गज मंडळी नि बाळ दाते यांच्या कामच कौतुक केलं आहे












