गौरव पोंक्षे माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीने,
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिलांच्या सहभागातून रस्त्यांची स्वच्छता व साफसफाई केली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने माखजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील रस्त्यांची कामे तसेच रस्त्यांची व पाणंद रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.गावातील स्वच्छता राखणे, रस्ते सुस्थितीत ठेवणे आणि दळणवळण सुलभ होण्यासाठी महिलांनी एकत्र येत श्रमदानातून रस्त्यांची साफसफाई केली. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे कार्य अत्यंत प्रभावीपणे झाले.
या उपक्रमामधून महिलांच्या सामाजिक सहभागाचे महत्व अधोरेखित झाले.
यावेळी गावचे सरपंच श्री.महेश बाष्टे, सदस्या सौ.वैष्णवी चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत रणखांब, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत माखजन कार्यक्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.












