खेड (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार संघटना, खेड या संघटनेची सन २०२६ साठीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गोविंद राठोड यांची तर उपाध्यक्षपदी राकेश कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी अधिकृतपणे घोषित करण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत सचिवपदी उमेश खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदाची जबाबदारी राकेश कोळी यांच्यासह ज्ञानेश्वर रोकडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सहसचिवपदी शुभम केसकर, खजिनदारपदी सिद्धेश परशेट्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून नंदेश खेडेकर, सागर कदम, रुपेश चव्हाण, सचिन खेडेकर आणि मंदार आपटे यांची निवड करण्यात आली आहे. तर संघटनेच्या मार्गदर्शनासाठी सल्लागार म्हणून दिवाकर प्रभु, हर्षल शिरोडकर आणि चंद्रकांत बनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी मावळते अध्यक्ष दिवाकर प्रभु यांनी नूतन अध्यक्ष गोविंद राठोड तसेच संपूर्ण कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवड प्रक्रियेच्या वेळी राजू चव्हाण, देवेंद्र जाधव, मुजीब नाडकर, संतोष आंबरे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीमुळे खेड तालुक्यातील पत्रकार संघटना अधिक सक्रिय व संघटित होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.











