लांजा (प्रतिनिधी): भांबेड पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने किरण प्रभाकर रेवाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या गणातील निवडणूक ही चुरशीची आणि रंगतदार होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संपर्क अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले किरण रेवाळे यांचा भांबेड परिसरात चांगला जनसंपर्क आहे. संपूर्ण लांजा तालुक्यातील ८ पंचायत समिती आणि चार जिल्हा परिषद गटातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने किरण रेवाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. भांबेड पंचायत समिती गणातून ते निवडणूक लढवित असल्याने येथील निवडणूक ही तिरंगी होणार आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना किरण रेवाळे यांच्यासोबत मनसेचे तालुका अध्यक्ष मनोज देवरुखकर तसेच परशुराम रसाळ, संजय गवळी, मटकर, पिंट्या रेवाळे ,शशिकांत रेवाळे, प्रभाकर रेवाळे मनोहर कुळ्ये, मंगेश कुळ्ये, आशिष कानसे, आकाश कानसे, भाई कानडे ,सौरभ गाडे, महेश गावंडे, रमेश रेवाळे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Home महत्वाच्या बातम्या मनसे कडून किरण रेवाळे मैदानात, भांबेड पंचायत समिती गणातील निवडणूक होणार रंगतदार













