रत्नागिरी ः प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलिस दलामार्फत जिल्ह्यातील 6 बेटांवर ध्वजारोहण करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 15 बेटे असून त्यापैकी 2 बेटे मनुष्यवस्तीची व 13 बेटे निर्मनुष्य आहेत. त्यापैकी सुवर्ण दुर्ग किल्ला (बेट),हर्णे,दापोली,बाब मलंग दर्गा,खेड,जुवाड पेठ बेट गोवळकोट,चिपळूण,जुव्याचे पेंद, कुरधुंडा,संगमेश्वर,जुवे बेट,बुरंबेवाड,नाटे आणि वाकडवन,कोंडसर,नाटे या 6 बेटांवर हे ध्वजारोहण करण्यात आले.
पंतप्रधान,भारत सरकार यांनी डीजीपी-आयजीपी परिषद 2024 मध्ये सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दाज्यातील निर्जन बेटांवर दरवर्षी दि.15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करावे तसेच त्या ठिकाणी रात्र वास्तव्य करावे,असे निर्देश महाराष्ट्र पोलिस दलाला दिलेले आहेत. त्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी हद्दीत असलेल्या बेटांवर जिल्हा पोलिस दलामार्फत हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.
यापैकी दापोलि पोलिस ठाणे हद्दीमधील सुवर्ण दुर्ग किल्ला (बेट),हर्णे दापोलि येथे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन बगाटे, दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर,पोलिस उपनिरीक्षक हेमराज निर्मळ,राजकुमार यादव, मत्स्य विभाग व बंदर विभाग दापोली येथील कर्मचारी वर्ग, पोलिस पाटील, माजि सैनिक,एनसीसीचे विद्यार्थी व पोलिस अंमलदार उपस्थित होते.











