कास दाभाळवाडीत वनविभागाकडून बिबट्या जेरबंद 

बांदा : प्रतिनिधी                गेले दोन महीने कास – दाभाळवाडी येथे भरवस्तीत धुडगूस घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याने दहशत माजवत परिसरातील कुत्रे व बकऱ्यांना भक्ष्य केले होते. सोमवारी रात्री स्थानिकांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात पकडले.

 

सध्या काजूचा हंगाम सुरू असून बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ काजू बागेत जाण्यास धजावत नव्हते. संध्याकाळच्या सुमारास बिबट्या भरवस्ती नजीक येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. ग्रामस्थाची बिबट्याला बंदोबस्त करण्याची मागणी होती. अखेर सोमवारी सायंकाळी रेस्क्यू पथकाचे बबन रेडकर पथकासमवेत दाखल झाले. बिबट्या सांयकाळी नेहमी प्रमाणे भक्ष्यच्या शोधात आला असता पिंजऱ्यात असलेल्या बकरीला पकडण्यासाठी गेल्याने अखेर बिबटा जेरबंद झाला आणि स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

 

यावेळी सुभाष भाईप, योगेश भाईप, शुभम फाटक, आनंद राणे, देवेंद्र परब, गोपाळ सावंत,

उपवनसंरक्षक मीलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर, राकेश आम्रुसकर, वनरक्षक प्रकाश रानगीरे, वनसेवक चंद्रकांत पडते हे सहभागी झाले होते.