शिवजयंतीचे औचित्य साधून पार पडला कार्यक्रम
लांजा (प्रतिनिधी) शिवजयंतीचे औचित्य साधून ४०×४० च्या भव्यदिव्य अशा स्टेजवर पार पडलेल्या नेत्रदीपक शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिकांनी लांजावासीय अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. वेंगरूळ भुदरगड (कोल्हापुर) येथील लखन दिलीप जाधव गुरुजी यांच्या गुरुकुलम संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हे शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक सादर केले.
लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून लांजा तहसील कार्यालयासमोर भव्यदिव्य असा स्टेज उभारण्यात आला होता.युवा पिढी सक्षम ,संयमी चारित्र्य संपन्न आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित व्हावी म्हणून गुरुकुलम चे संस्थापक, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक पुरस्कार सन्मानित वेंगरूळ भुदरगड कोल्हापुर येथील एकागुरुकुलम संस्थेच्या विद्यार्थ्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रात्यक्षिक कार्यक्रम शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर केला.त्यामध्ये भारतीय व्यायाम, लाठी, भाला, पट्टा, बाणा, विटा, फ्री गदगा लढाई, लिंबू काढणीचे प्रकार (पटकाप) आदी प्रात्यक्षिके सादर केली.या सर्वच युद्धकलांनी लांजा वासीय अक्षरशः भारावून गेले.
या संपूर्ण प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये गुरुकुलमचे सुरज नलवडे,वीर जोंधळे,मारुती सावंत,हर्षवर्धन काळे, प्रसन्न शेळके,दिगंबर रेडेकर,आदिराज पाटील ,प्रीती जाधव, धनश्री अतिग्रे, स्नेहा झुरे, तन्वी काळे, श्रेया ढेरंगे, उर्वी भिडे सहभागी झाले होते. लखन दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले.













