प्रज्ञा हेमण चे विभागीय स्पर्धेत यश

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु.प्रज्ञा प्रसाद हेमण हिने चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या विभागीय ३ किमी. रेस वॉक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तालुका,जिल्हा स्तरावर उत्कृष्ठ कामगिरी करत,तीने विभागीय स्पर्धेत ठसा उमटवला. तिला आजवर प्रा अभिजित सुर्वे आणि निखिल वारके यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर,उपाध्यक्ष राजेश फणसे,सचिव श्रीकांत फाटक व अन्य संचालक,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी अभिनंदन केले आहे.कु प्रज्ञा च्या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.