गुहागर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गुहागर तालुक्याचा एकूण निकाल 91.72 टक्के इतका लागला आहे.
यामध्ये माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेज गुहागरचा एकूण निकाल 85 टक्के इतका लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 93.12 टक्के,वाणिज्य शाखेचा निकाल 73.73 टक्के तर कला शाखेचा निकाल 79.16 टक्के इतका लागला आहे. पालशेत ज्युनिअर कॉलेज चा निकाल 91.13 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 86.11 टक्के, कला शाखेचा निकाल 94.73 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 95.83 टक्के इतका लागला आहे. चंद्रकांत बाईत विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज आबलोलीचा निकाल 97.59 टक्के इतका लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 97.29 टक्के इतका लागला आहे.तर वाणिज्य शाखेचा निकाल 97.50 टक्के इतका लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाटपन्हाळेचा निकाल 94.50 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 93.67 टक्के, कला शाखेचा निकाल 95.23 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 94.56 टक्के इतका लागला आहे. शृंगारी उर्दु हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज शृंगारतळीचा निकाल 94.33 टक्के इतका लागला असून कला शाखेचा निकाल 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 90 टक्के इतका लागला आहे. अंजनवेल कॉलेजचा निकाल 92.10 टक्के इतका लागला असून कला शाखेचा निकाल 89.65 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तळवलीचा निकाल 100 टक्के लागला असून कला व वाणिज्य शाखेचा निकाल 100 लागला आहे.












