धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
दुचाकी रॅलीपासून दशावतारी नाट्यप्रयोगापर्यंत विविध आयोजन
कणकवली : वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवार, ९ मे रोजी कणकवली येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह (राणे समाज) उत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता दुचाकी रॅलीने होणार असून सकाळी १०.३० वाजता पूजाविधी व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम रंगणार आहे.
त्यानंतर रात्री ८ वाजता कणकवली बांधकरवाडी येथील दत्तप्रासादिक मंडळाचे भजन होणार असून रात्री ९ वाजता ‘कालिका महात्म्य’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
रवळनाथ मंदिर शेजारील वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.













