भाजपा देवगड जामसंडे शहरच्यावतीने नगरपंचायत हद्दितील विविध विकास कामांबाबत चर्चा मा.मुख्याधिकारी यांच्यासमवेत करण्यात आली यावेळी भाजपा जेष्ठ नेते बाळ खडपे,भाजपा नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर,नगरसेवक सभापती सौ. तन्वी चांदोस्कर,श्री बुवा तारी,श्री रोहन खेडेकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर, शहराध्यक्षा तन्वी शिंदे,नगरसेविका प्रणाली माने,भाजपा उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, योगेश पाटकर,शक्तीकेंद्र प्रमुख सुभाष धुरी,बाळा गावकर,माजी नगरसेवक उमेश कणेरकर,स्विकृत नगरसेवक चंद्रकांत कावले,शिवाजी कांदळगावकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
खालील विषय चर्चेत घेण्यात आले
१ नगरपंचायत मधील विविध विकासकामे
२ अर्धवट स्थितित असलेल्या विकासकामांबद्दल सूचना
३ पाणीपुरवठा दुरुस्तीकामाबद्दल आढावा
४ स्वच्छता समिती अंतर्गत येणाऱ्या सांडपाण्या विषयी तक्रारी विषयी माहिती घेतली आणि त्यावर उपाययोजना













