आबलोलीत प्रश्न मंजुषा कार्यक्रम उत्साहात संपन्न

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एम.के.सीएल आणि सुयश कॉम्पुटर्सचा स्तुत्य उपक्रम

आबलोली | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील माद्यमिक विद्यालय आणि उच्च माद्यमिक विद्यालय आबलोली येथे सुयश कॉम्पुटर्स आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांचे अधिपत्याखाली १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त शाळा व कॉलेज मध्ये विद्यार्थांची बौद्धीक क्षमता वाढविण्यासाठी प्रश्न मंजूषा हा कार्यक्रम , हि परिक्षा घेण्यात आली एम.के.सीएल आणि सुयश कॉम्पुटर्स सेंटर आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने असा स्तुत्य उपक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित(एम.के.सीएल) हि संस्था महाराष्ट्र राज्य शासन, महाराष्ट्रातील प्रमुख ९ ,शिक्षण संस्था व काही सामाजिक संस्था यांच्या सहयोगातून स्थापन झाली आहे.सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ,माहिती तंत्रज्ञानाच्या माद्यमातून अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात हि संस्था गेली २१ वर्ष कार्यरत आहे
१५ अॉगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परिक्षेचे आयोजन शाळा,कॉलेजच्या विद्यार्थांना काही क्रांतिकारी,सत्याग्रह,स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरूष यांच्या जिवनाचा अभ्यास करून त्यावर आधारीत परिक्षा घेण्यात आली आणि हा असा उपक्रम एम.के.सीएलने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबवला असून सदरील परिक्षा अॉफ लाईन पध्दतीने म्हणजेच पेपरवर दिली जात असून हि परिक्षा विनामुल्य घेण्यात येत आहे अशी मौलिक माहिती सुयश कॉम्पुटर्सचे संचालक संदेश साळवी यांनी दिली.