चिपळूण (प्रतिनिधी) : तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदी महादेव चव्हाण यांची निवड प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी टिळक भवन मुंबई येथून जाहीर केले असून चिपळूण काँग्रेसचे प्रभारी शशांक बाविस्कर, जिल्हाधक्षा सोनललक्ष्मी घाग यांचे हस्ते देण्यात आले.
महादेव चव्हाण हे अष्टपैलू व्यक्तिमत्व पोफळी गावची शान आहे आणि ते कित्येक वर्षे ग्रामपंचायत पोफळीचे सदस्य, उपसरपंच पद भूषविले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकही लढवली होती, ग्राम शिक्षण समिती सभापती, आदर्श शाळा पोफळी होडेवाडी येथील महाराष्ट्र राज्य माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा पोलिस दक्षता समिती, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष, नाभिक महामंडळचे प्रांतसंघटक, कोषाध्यक्ष, कोकण विभागीय अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, या पदावर दसपटी संस्था, चिपळूण तालुका अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष, कार्यधक्ष अशी सामाजिक पदे तसेच श्री संत सेना महाराज पतसंस्था राज्यस्तरीय शाखा मंजूर केल्या असून पाच शाखा कार्यान्वित आहेत अशा अष्टपैलू व्यतिमत्वाची चिपळूण तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.











