आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम प्रशासनाने वेगाने राबविली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्य रस्ते, नगरप्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाटाकडे जाणारे मार्ग आदी ठिकाणांवरील हातगाडे, टपऱ्या व अन्य अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते मोकळे होत वारकऱ्यांच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळाला आहे.
नगरप्रदक्षिणा मार्गावरील पायऱ्या, पत्र्याचे शेड, छप्परे व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईवेळी आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.












