दोडामार्ग: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दोडामार्ग तालुक्याची साप्ताहिक बैठक नुकतीच येथील हॉटेल सोनचाफा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासह आगामी निवडणूक पूर्व तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपसरपंच अमोल परब यांचा सत्कार
ग्रुप ग्रामपंचायत आडाळी-फोंडयेच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र सैनिक अमोल परब यांचा मनसे दोडामार्ग तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत
पक्ष विस्ताराचे नियोजन आणि ‘बी.एल.ओ.’ नियुक्तीवर भर
बैठकीत दोडामार्ग तालुक्यात मनसेचे नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी विविध गावांमध्ये नवीन शाखा स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले.
मनसे नेते शिरीष सावंत यांच्या सूचनेनुसार, तालुका निवडणूक पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारसंघात लवकरात लवकर बी.एल.ओ. (BLO) नियुक्त्या करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला मनसेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,यामध्ये
दत्ताराम गावकर (माजी उपजिल्हाध्यक्ष)विनायक सावंत (तालुकाध्यक्ष)संदीप गवस (तालुका सचिव)अमोल परब (उपसरपंच)
मनसे पदाधिकारी नाना देसाई, नवलु झोरे, अक्षय कुबल, महेश जाधव, मधुसूदन खांबल, महेश वरक, मुकुंद परब आणि इतर कार्यकर्ते आदी उपस्थित होते
तालुक्यात मनसेची ताकद वाढवण्यासाठी सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.












