रत्नागिरी जिल्हा परिषद सेवा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजापूरचे ताश्कंद तांबे यांची बिनविरोध निवड

संस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच राजापुर तालुक्याला अध्यक्षपदाचा बहुमान

राजापूर प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा परिषद सेवा सहकारी पतसंस्थेच्या संस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच राजापूर तालुक्याला अध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त झाला आहे. राजापुर तालुका पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक ताश्कंद तांबे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तांबे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हयातुन तसेच राजापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद सेवा सहकारी पतसंस्थेची स्थापना 15 ऑक्टोबर 1967 रोजी झाली आहे. त्यानंतर प्रथमच अध्य्यक्षपदाचा बहुमान तांबे यांच्या निवडीने राजापूर तालुक्याला मिळाला आहे.
या संस्थेमध्ये राजापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना श्री. तांबे यांनी संस्थेचे संचालक म्हणून जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. पदवीधर असलेल्या श्री. तांबे यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय जाण आणि सहकार क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर संचालक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ते राजापूर पंचायत समितीमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असून, अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांशी असलेल्या त्यांच्या सुसंवादपूर्ण संबंधांमुळे त्यांना सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या निवडीसाठी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, नागेश बेर्डे, दिनेश सिनकर, समीर सुद, संजय कांबळे, समीर इंदूलकर, दयानंद पवार, राकेश पांचाळ यांसहीत सर्व सांलक व सभासदानी सहकार्य केले असल्याचे तांबे यांनी सांगितले. नवीन अध्यक्ष म्हणून तांबे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेची प्रगती अधिक वेगाने होईल आणि सभासदाभिमुख, पारदर्शक व विकासाभिमुख कार्याला चालना मिळेल, असा विश्वास सभासदांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो 5 आरजेपी 9
राजापुर तालुका पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक ताश्कंद तांबे यांची रत्नागिरी जिल्हा परिषद सेवा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दत तांबे यांचे अभिनंदन करताना मान्यवर.