भजनातील मृदुंगवादन व गायन करणारे गणेश किर्वे यांचा सत्कार

गुहागर प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील वरवेली येथील संगीत भजनातील मृदुंगवादन व गायन करणारे लोक कलावंत गणेश जगन्नाथ किर्वे यांचा मुंढर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सत्कार करण्यात आला.
भजनी कलाकारांचा सत्कार करणे म्हणजे त्यांच्या संगीत साधनेचा आणि कलेचा सन्मान करणे होय. श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी
शाल, श्रीफळ, आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी उपस्थित होते.यावेळी गणेश किर्वे म्हणाले की, भजनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे भजनी गायक आणि टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात रंग भरणारे आमचे वादक, खऱ्या अर्थाने या भजनाचे प्राण आहेत. आपली संगीत सेवा अशीच अविरत चालू राहो आणि विठ्ठलाची कृपा आपल्यावर सदैव राहो, याच सदिच्छेसह आपला यथोचित सन्मान स्वीकारत आहोत. यावेळी कीर्तनकार तसेच सर्व कीर्तन साथ देणारे वारकरी मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.