मुंबई : घोलवड आणि उमरगाव रोड स्थानकांदरम्यान असलेल्या पुल क्रमांक २०३ वर धोक्याच्या पातळीपेक्षा पाणी वाहत असल्याने पश्चिम रेल्वेने रेल्वे वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. या निर्णयानुसार एक एक्स्प्रेस गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली असून सात एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक २०९१० पोरबंदर–कोचुवेली एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
तसेच २२ जुलै रोजी सुटलेली गाडी क्रमांक १२२१८ चंदीगड–तिरुवनंतपुरम सेंट्रल केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस ही सुरत–पालधी–जळगाव–इगतपुरी–पनवेल–रोहा मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक २२९०८ हापा–मडगाव जंक्शन एक्स्प्रेस ही सुरत–पालधी–जळगाव–इगतपुरी–पनवेल–रोहा मार्गे धावणार आहे.
गाडी क्रमांक १२४८३ तिरुवनंतपुरम सेंट्रल–अमृतसर जंक्शन एक्स्प्रेस ही रोहा–पनवेल–इगतपुरी–जळगाव–पालधी–सुरत मार्गे चालविण्यात येत आहे.
गाडी क्रमांक २२४७५ हिसार–कोयंबतूर जंक्शन एक्स्प्रेस ही सुरत–जळगाव–इगतपुरी–पनवेल–रोहा मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १६३३८ एर्नाकुलम जंक्शन–ओखा एक्स्प्रेस तसेच गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जंक्शन–हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या पनवेल–इगतपुरी–जळगाव–पालधी–उधना–सुरत मार्गे धावणार आहेत.
याशिवाय २३ जुलै रोजी सुटणारी गाडी क्रमांक १६३३३ वेरावळ–तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस ही सुरत–जळगाव–इगतपुरी–पनवेल–रोहा मार्गे वळविण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन केले असून, या बदलांमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.













