राजापूर प्रतिनिधी :मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथील महालक्ष्मीच्या मंदिरा जवळील एका अवघड वळणावर मुंबईवरून गोव्याला मिठाची पोती भरून निघालेला ट्रक पलटी हाऊन अपघात झाला. गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.
हा अपघातग्रस्त ट्रक नंबर GJ-12-BV-6644 मुंबईकडून गोव्याकडे जात होता. या वळणणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर वरून विरुद्ध दिशेला जाऊन हा टृक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ड्राइव्हर किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने पलिकडून कोणतीही गाडी नसल्याने अनर्थ टळला. मात्र या टृकमधील मिठाच्या पिशव्या रस्त्यावर पसरल्या होत्या.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत पलटी झालेल्या ट्रकरच्या बाजुला बॅरेकेटर्स लावून वाहतुक सुरळीत केली. या प्रकरणी पोलीसांती अपघाताची नोंद केली आहे. शुक्रवारी टृक हटविण्याचे काम सुरू होते.













