डॉ.आनंद आंबेकर यांची पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याचे समन्वयकपदी नियुक्ती

रत्नागिरी :
डॉ.आनंद आंबेकर डिपार्टमेंट ऑफ परफॉरमिंग आर्टसचे. विभाग प्रमख म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे गेली २७ वर्ष कार्यरत आहेत. सन २०२६ साली महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आयोजित पुरूषोतम करंडक स्पर्धेचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांचे “समन्वयक” म्हणन नियक्ती झाली आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे यांच्या वतीने पूणे विदयापीठ स्तरावर 1963 पासून ” पुरुषोतम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या करीत आहे
सन २०१० सालापासून “पुरुषोतम करंडक” स्पर्धेचे आयोजन पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर व अमरावती ‘ येथे ‘ केले जाते. या केंद्रावरील ‘ पारितोषिक विजेत्या एकूण २० विजेत्या संघांची डिसंबर मध्ये पुण्यात राज्यस्तरीय महाअंतिम फेरीचे आयोजन करण्यात येते. महाअंतिम स्पर्धेचा सर्व खर्च विना प्रायोजक महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे
सन २०२६ रोजी रत्नागिरी कैंद्र पुरूषोतम करंडक स्पर्धेचे “समन्वयक” म्हणून डॉ. आनंद आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सांस्कृतिक चळवळ यशस्वी होण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती श्री राजन ठाकुरदेसाई चिटणीस- महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे.
श्री सुहास नांगरे खजिनदार- महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे.
यांच्यातर्फे करण्यात आली.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री सतीश शेवडे ,रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर ,कलोपासक पुणे कार्यकर्ते आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य डॉ.संजय केतकर ,प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई,उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, उपप्राचार्य डॉ.सीमा कदम यांनी अभिनंदन केले आहे