साडवलीतील श्रीदेवी वाघजाई क्रीडा मंडळाच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी भव्य चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील श्रीदेवी वाघजाई क्रीडा मंडळ साडवली यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी भव्य अशा चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपारिक शेतीचे महत्व आणि युवा वर्गाचा कल शेतीकडे वळला पाहिजे हे उद्दिष्ट जोपासत श्रीदेवी वाघजाई क्रीडा मंडळ साडवलीच्या सदस्यांनी या चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही स्पर्धा गावठी आणि घाटी बैल जोडी अशा दोन गटात घेतली जाणार असून या दोन्ही गटात अनुक्रमे पहिल्या दहा क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
शेतकरी बैलजोडी मालक मोठ्या हौसेने अशा स्पर्धांमध्ये सहभागी होतात. जिल्ह्यातील नामांकित बैल जोड्या सहभागी होत असल्याने या बैलजोड्या पाहण्यासाठी प्रेक्षक तोबा गर्दी करतात. मंडळाच्या वतीने सर्व बैलजोडी मालकांना आणि तालुक्यातील हौशी प्रेक्षकांना या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित रहाण्याची विनंती केली आहे. नक्कीच डोळ्याचे पारणे फिटेल अशी भव्यदिव्य स्पर्धा श्रीदेवी वाघजाई क्रीडा नगरी मावळेश्वर मंदिर, ठाकरे हायस्कूलच्या मागे, साडवली येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे आयोजक श्रीदेवी वाघजाई पालखी नृत्य पथक साडवली असून या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी श्री.बाबल्याशेठ पातेरे, ९४२१२८२७०८, श्री.उमेश पातेरे, ७७७६९२५४५२, श्री.सचिन पातेरे
९१४६११५१७०, श्री. नंदन डोंगरे
८८०५८०००८९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.