श्री देव धुतपापेश्वर चरणी १३ ऑगस्टला लघुरुद्र स्वाहाकार सोहळा;महाप्रसादाचेही आयोजन

राजापूर (वार्ताहर): हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण मासाच्या शुभारंभाचे औचित्य साधून मौजे धोपेश्वर येथील श्री देव धुतपापेश्वर यांच्या पवित्र चरणी ‘लघुरुद्र स्वाहाकार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा भव्य धार्मिक उत्सव गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. या पवित्र धार्मिक सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सकाळी ७.०० वाजल्यापासून ‘लघुरुद्र स्वाहाकार’ विधीला प्रारंभ होईल. त्यानंतर दुपारी १.०० वाजता भगवान श्री देव धुतपापेश्वर यांची भव्य ‘महाआरती’ करण्यात येईल. महाआरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी ‘महाप्रसादाची’ व्यवस्था करण्यात आली आहे.

संपूर्ण मंगलमय आणि पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी आपल्या कुटुंबियांसह व मित्रपरिवारासह उपस्थित राहून भगवान श्री देव धुतपापेश्वर यांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.