नागरिकांनी दिले जीवदान
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील धुरीवाडा साई मंदिरनजीक कठडा नसलेल्या धोकादायक विहिरीत म्हैस पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
म्हैस विहिरीत पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदतकार्य केले. अथक प्रयत्ननी नागरिकांनी म्हैस सुखरूप बाहेर काढली.
या ठिकाणी असलेल्या पायवाटेने परिसरातील नागरिकांची ये-जा असते. जमीन सपाटीला असलेली आणि कोणताही कठडा नसलेली ही विहीर नागरिकांसाठीही धोकादायक ठरत आहे. तरी विहिरीभोवती संरक्षक कठडा उभारून धोका दूर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.












