हर घर तिरंगा अभियान : शिरोडा वेळागर येथे श्री देव लिंगेश्वर मंदिर स्वच्छता अभियान..

भाजप शिरोडा -आरवली यांच्या कडून आयोजन

वेंगुर्ले : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून संपूर्ण देशात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. त्या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून भाजप शिरोडा, आरवली यांच्या कडून शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर परिसरात स्वच्छतेचे अभियान राबविण्यात आले. या वेळी स्वच्छता साहित्य झाडू, खोरे, घमेले श्री देव लिंगेश्वर मंदिर कमिटी यांना भेट म्हणून देण्यात आले.

या वेळी श्री देव लिंगेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, सदस्य विजय पडवळ, श्रीकृष्ण धानजी, दादा शेटये त्याच प्रमाणे मदन अमरे व सौ.मयूरी अमरे उपस्थित होते. या वेळी वरील मान्यवरांसोबत स्वच्छता अभियानात भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर,तालुका कार्यकारणी सदस्य संतोष अणसूरकर,आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,आरवली सरपंच समीर कांबळी,तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे,युवा मोर्चा तालुका कार्यकारणी सदस्य सोमाकांत सावंत,शिरोडा भाजप पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,प्रसाद परब,अभय बर्डे,दत्ताराम फटजी,अशोक परब,शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर,आरवली भाजप पदाधिकारी मिलिंद साळगांवकर,भाजप शिरोडा युवा नेता संतोष धानजी,तालुका महिला मोर्चा पदाधिकारी सौ.स्नेहा गोडकर,या भाजप पदाधिकारी यांचा सहभाग होता.