गुहागर समुद्रकिनारी झारखंडच्या दोन पर्यटकांना वाचविण्यात यश

गुहागर नगरपंचायतीच्या दोन जीवरक्षकांचे कौतुक

गुहागर प्रतिनिधी
सलग दोन दिवस शनिवार, रविवार सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गुहागर समुद्रकिनाऱ्यावर चिपळूणच्या दोन मित्रांसमवेत फिरायला आलेल्या झारखंडच्या दोन पर्यटकांना बुडताना गुहागर नगरपंचायतीच्या दोन जीवरक्षकांनी वाचवले. या दोन जीव रक्षकाने वेळीच तत्परता दाखवल्याने या दोन पर्यटकांचे जीव वाचल्याचे सांगण्यात आले. चिपळूण येथील गफार भट व झारखंड येथील हिरालाल कर्मली अशी या दोघांची नावं आहेत.
झारखंड मधून आठ जणांचा ग्रुप गुहागर समुद्रकिनारी फिरायला आला होता. या पर्यटकांपैकी दोघांना पोहण्याचा मोह आवरला नाही. पोहता पोहता समुद्रामध्ये बुडत असताना या दोघांचा 15 ऑगस्ट निमित्त असलेला सुट्टीचा फायदा घेत एकूण आठ जणांचा हा ग्रुप पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरला. पोहताना यातील दोघेजण खोल समुद्रामध्ये खेचले गेले तब्बल दोन पुरुष पाण्यामध्ये ते बुडत असताना अशावेळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले गुहागर नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व साहिल तोडणकर दोघांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. या दोघांनी बचाव साहित्य आणण्यास विलंब न लावता थेट त्या दोघांना गाठून पोहत त्या दोघांनाही समुद्र किनाऱ्यावर आणले. जीवरक्षक प्रदेश तांडेल व साहिल तोडणकर यांच्या या धाडसाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.