निसर्गरम्य मालवणात आलिशान सोयी-सुविधांची पर्वणी
अमित खोत | मालवण : मालवणच्या पर्यटन समृद्धीत आणखी एका दिमाखदार वास्तूची झळाळी प्राप्त झाली आहे. आकर्षक आधुनिक वास्तुरचना, आलिशान अंतर्गत सजावट, प्रशस्त सुविधा आणि पर्यटकांच्या सुखद आणि आनंददायी पर्यटनाचा सर्वांगीण विचार करून साकारण्यात आलेल्या ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ चा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार २४ ऑगस्ट रोजी होत आहे. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात साकारलेले हे आलिशान हॉटेल मालवणमध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांसाठी दर्जेदार पर्याय ठरणार आहे.

मालवणच्या पर्यटन क्षेत्राला आधुनिकतेची जोड देणारी ही भव्य वास्तू पाहताच लक्ष वेधून घेते. आकर्षक बाह्यरचना, प्रशस्त खोल्या, आलिशान सुविधा आणि आरामदायी वातावरण यामुळे ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ पर्यटकांच्या मुक्कामाचा अनुभव अधिक सुखद आणि संस्मरणीय करण्यासाठी सज्ज झाले आहे.

या भव्य वास्तूमध्ये २२ आलिशान रूम, बाथटबसह २ विशेष सुट, रेस्टॉरंट तसेच ४० ते ५० व्यक्तींच्या क्षमतेचा प्रशस्त बँक्वेट हॉल उपलब्ध आहे. यासोबतच जनरेटर बॅकअप, वाय-फाय, लिफ्ट, प्रशस्त पार्किंग यांसह पर्यटकांच्या सोयीसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मालवणमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक दाखल होतात. पर्यटनाच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून पर्यटकांना स्टार दर्जाच्या सुविधा, आलिशान निवास, उत्तम आदरातिथ्य आणि प्रसन्न वातावरण मिळावे, या उद्देशाने ‘शिरगांवकर बीच रिसॉर्ट’ची उभारणी करण्यात आली आहे.

उदघाटन सोहळानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन
मालवण बंदर जेटी जवळील डॉ. बल्लव रोड, मेढा-मालवण, सिंधुदुर्ग येथे हे रिसॉर्ट असून, उद्घाटन सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा सोहळा होणार आहे. या वास्तू उद्घाटन सोहळ्यास मित्रपरिवार, हितचिंतक, नागरिक आणि पर्यटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिरगांवकर बीच रिसॉर्टच्या वतीने शिरगांवकर कुटुंबिय मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.












