मुंढर /वार्ताहर:
गुहागर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदि युवा सामाजिक कार्यकर्ते मयूर गमरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.या निवडिमुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गुहागर तालुक्यातील आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी च्या बाजूला असलेली चिखली ग्रामपंचायत म्हणजे विकासाच्या मार्गांवर आरुढ होणारे गाव. गावात सर्व जाती धर्मात सळोखा राहावा म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी प्रथमच ग्रामस्थानी युवा नेतृत्व मयूर गमरे यांना संधी दिली आहे.
मयूर गमरे एक युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्व परिचित आहेत.विविध धार्मिक, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून समाज कार्य करण्याच्या स्वभावामुळे ते सर्वसामान्य जनतेत प्रसिद्धिस आहेत. मयूर गमरे यांनी सुरुवातीच्या काळात मुंबई येथे नामांकित हॉस्पिटल मध्ये डायग्नोस्टिक मॅनेजर पदी नोकरी केल्यानंतर एका नामांकित कंपनीत जनरल मॅनेजर म्हणूनही काम केले.
मात्र सामाजिक कार्य स्वस्त राहू देत नव्हते, आणि समाज कार्याचा वसा हाती घेतला. त्याचाच एक गौरव म्हणून चिखली ग्रामस्थानी सर्वानुमते मयूर गमरे यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













